आम्ही लडाखमध्ये प्रवेश करत होतो. सभोवतालचं जगचं बदलून गेलं होतं. मातीचा रंग, ढगांचे आकार, आकाशाची निळाई सर्वच नेहमी पेक्षा वेगळं. सगळीकडे फक्त रंगांचीच उधळण. काय पाहू काय नको, कशाकशाचे म्हणून फोटो काढायचे ? आता थांबायचं नाही असं अनेकदा ठरवून आम्ही थांबतच गेलो. रांगोळीचे रंग कमी वटावेत असे मातीचे रंग, असंख्य छटा आणि आकार पुर्ण कॅनव्हासच निसर्गाने रांगोळीने भरुन टाकला होता.काही ठिकाणी क्वचित दिसणारं गवत सोडलं तर झाड हा प्रकारच आता नव्हता, पण मातीचे रंगच असे ही झाडांची उणीवच भासू नये. मोरपिसी,निळा,जांभळा, राखाडी,पाढरा जाऊदे रंग रंग आणि रंग! मधूनच वाहणार्या नद्या त्या रंगांशी खेळत डोंगरांचे, जमिनीचे आकार बदलत चालल्या होत्या.
लाचूंगला पास (१५८०० फूट ) , नकिला पास ( १६२०० फूट) हे आणखी दोन पास ओलांडून आम्ही पांग या गावी आले तेव्हा अगदी गळपटून गेलो हेतो. थोडी विश्राती घेऊन आम्ही निघालो तेव्हा कँप्टन मोरे पठार लागले.६० कि.मी. चं हे पठार उत्तम लँन्ड्स्केप असुनही फोटोकाढायचा उत्साह जरा कमीच झालेला. ( बारलाचला पासच्या धावपळीने बाधित झालो होतो) पण तेवढ्यात वाइल्ड अँस हा सहसा न दिसणारा प्राणी दिसला. आम्ही पुन्हा कँमेरे सरसावले, खाली उतरून त्यांचे फोटो घेतले, पुन्हा एकदा उत्साह संचारला. तांगलांगला पास (१७५८२ फूट) ला आम्ही पुर्वानुभवामुळे कमी हालचाल केली. आता उन्हं कमी कमी होत गेली. उप्शी, कारू अशी लेहजवळची गावं आली जवळ जवळ २२५ कि.मी. नंतर आम्ही मानवी वस्ती पहात होतो. आकाश जवळ आल्याचा भास होत होता . तारे मोठे दिसायला लागले होते. मुक्कामाला पोहोचलो तेव्ह रात्रीचे १०.३० वाजले होते.
(अपुर्ण....) जायचय लडाखला ? चला.....
लेखकः नरेंद्र प्रभू
No comments:
Post a Comment