अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे 'स्वामी तिन्ही जगांचा' च असतो. सध्याचे 'प्रेसिडेंन्ट इलेक्ट' बराक ओबामा हे फेब्रुवारी २००९ मध्ये शपथ घेणार आहेत, नंतर ते व्हाइट हाऊसमध्ये रहायला जातीलच. पण सध्या त्याना मुलींच्या शाळा सुरू होत असल्याने वाँशिंगटन मध्ये रहाणे क्रमप्राप्त आहे. व्हाइट हाऊसशेजारच्या 'ब्लेअर हाऊस' मध्ये तात्पुरते राहू द्यावे अशी विनंती त्यानी प्रशासनाला केली परंतू १५ जानेवारीपर्यंत ब्लेअर हाऊस 'रिझर्व्हड' आहे असे प्रशासनाने कळवल्यामुळे ओबामा भाड्याच्या हॉटेलात रहात आहेत.
'लोकसत्ता' मधील ही बातमी वाचुन आपल्या लोकशाहीची कींव करावीशी वाटली. सर्वच बाबतीत अमेरिकेची नक्कल करणार्या आपल्या राजकारण्यांनी असं जरुर वागावं. खरी लोकशाही असल्या मुळेच अमेरिकेतील प्रशासन 'प्रेसिडेंन्ट इलेक्ट' ला ही असं सांगण्याची हिम्मत दाखऊ शकलं. आपल्या देशात तर या अधिकार्याना आयुष्यातून उठवलं असतं. मंत्रिपद गेल्यावरही बंगले खाली न करणारे मंत्री, रेल्वेमंत्री लालू यादवांचे मेहुणे राजधानी एक्सप्रेस सारखी गाडी थांबा नसताना तास-तास स्वतःच्या माजापोटी उभी करून ठेवतात. बहुसंख्य लोकप्रतिनिधी सर्वच सार्वजनिक वाहनात दुसर्यांच्या आरक्षित जागेवर आपल्या चेल्या-चमच्यांसह अतिक्रमण करतात. सर्वात मोठ्या लोकशाही देशात ही लोकशाहीची विटंबना चालते तेव्हा ओबामाच्या आदर्शांची नक्कलतरी आपल्या राजकारण्यांनी करुन पहावीच.
नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment