बरोबर एक वर्षापुर्वी साधारण याच वेळी मी दूरचित्रवाणीवर मुंबईवरच्या हल्ल्याची बातमी पाहीली. पार्ल्याच्या पुलाजवळ झालोल्या बॉम्बस्पोटचा आवाज मला घरी बसूनच ऎकू आला. काहीतरी अघटीत घडतय याची जाणीव झाली. आपण सुरक्षित नाही असं वाटत राहीलं. पुढचे तीन दिवस मग तो विध्वंस उघड्या डोळ्यांनी पहातच होतो. त्याचीच एक प्रतिक्रीया म्हणून हा ब्लॉग सुरू केला. आज २६/११ च्या त्या घटनेला एक वर्ष पुर्ण होतय. काय सुधारणा झालीय आपल्यात, पोलिसात? एक NSG सेंटर, काही वाहनं. तीच बुलेटप्रूफ जॅकेट आणि त्याच बंदूका. एक गोष्ट मात्र तत्परतेने केली गेली, ती म्हणजे राजकिय पुढार्यांचं पुनर्वसन. चार महिन्यात विलासराव केंद्रात मंत्री झाले. वर्षाच्या आत आबा त्याच गृहमंत्री पदावर आले. शिवराज पाटील वाट बघताहेत.
या हल्यात जे शहीद झाले त्यांच्या कुटूंबियांचं, जे जखमी झाले त्यांचं पुनर्वसन कधी होणार? ते आता पहायच. आपण शहीदाना श्रद्धांजली अर्पण करू शकतो आणि जखमींना सहानभुती.