२०१२ या
पहिल्या वर्षांच्या ‘मॅक्सेल’ पुरस्काराचा वितरण सोहळा येत्या रविवारी दि. ६ मे २०१२ रोजी होणार असून या वर्षी चे
पुरस्कार विजेते असे आहेत: ‘मॅक्सेल
व्यावसायिक नेतृत्त्व प्रावीण्य’ वर्गवारीचा पुरस्कार गेल्या तीस
वर्षांत देशापरदेशातील अनेक विख्यात संस्थांच्या अत्युच्च पदावर कार्य केलेले
बोईंग इंडियाचे अध्यक्ष दिनेश केसकर यांना तसेच टाटा स्टील लिमिटेडचे व्यवस्थापकीय
संचालक हेमंत नेरूरकर यांना प्रदान केला जाणार आहे. बँक अधिकाऱ्यांचे सर्वोत्तम
संघटक ते बँक व्यवहाराचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे जनक आणि एक यशस्वी बँकर अशा
भूमिका लीलया निभावून या क्षेत्रातील एक आदर्श ठरलेले सारस्वत बँकेचे अध्यक्ष
एकनाथ ठाकूर यांना पहिला ‘मॅक्सेल
जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
‘मॅक्सेल उद्योजकीय प्रावीण्य’तेचा पुरस्कार म्हणून निर्लेप
सूमहाचे संस्थापक-संचालक असलेल्या राम भोगले, मुकुंद भोगले आणि नित्यानंद भोगले अशा तिघांची निवड करण्यात
आली आहे. याच वर्गवारीतील दुसरा पुरस्कार तब्बल ९० दशलक्ष अमेरिकी डॉलरची उलाढाल
असलेल्या डीएलझेड कॉर्पोरेशन या अमेरिकेत स्थापित कंपनीचे अध्यक्ष विक्रम
राजाध्यक्ष यांना दिला जाणार आहे.
‘मॅक्सेल
नाविन्यता प्रावीण्य’ पुरस्कार
क्विक हिल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि मुख्याधिकारी कैलास काटकर आणि संजय काटकर
यांना प्रदान केला जाईल, तर
‘मॅक्सेल
उदयोन्मुख प्रावीण्य’पुरस्काराच्या
प्लाझ्मा इंडियाच्या कार्यकारी संचालिका अरुंधती जोशी या मानकरी ठरल्या आहेत.
उध्योजकतेचं कौतून आणि मराठी माणसाचं तसं जवळचं नातं आहे
असं म्हणता येणार नाही. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, कवी संमेलन असे अनेक उत्सव
साजरे करणारे आपण उद्योजकते पासून थोडे दूरच उभे आहोत असं वाटत राहातं. मराठी
समाजाच्या याच उणीवेवर नेमकं बोट ठेवून त्या साठी प्रत्यक्ष कृती करण्याचं ठरवल ते
‘प्रगतीच्या
एक्सप्रेस वे’ या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचे लेखक आणि कॉर्पोरेट
लॉयर नितीन
पोतदार यांनी. मॅक्सेल (Maharashtra Corporate Excellence) फाउंडेशन या संस्थेचे ते निमंत्रक आणि
संस्थापक विश्वस्थ आहेत.
महाराष्ट्रातीच्या उद्योगजगतातील आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील
दिग्गज्जांनी त्यांच्या उत्तुंग कर्तुत्वाने अनेक शिखरं गाठली, पण हे कर्तुत्व
मराठी लोकांपर्यंत पोहोचलं नाही. उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी याची नितांत
आवश्यकता आहे. हे जाणवल्याने नितीन पोतदारांनी हा वसा हाती घेतला आहे. सुप्रसिद्ध
शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, जेष्ठ संपादक कुमार केतकर, ज्येष्ठ
शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, लार्सन
अॅण्ड टुब्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत देवस्थळी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, निवृत्त न्यायमूर्ती अरविंद
सांवत, अमेरिकेतील
उद्योगपती सुनिल देशमुख आदी मॅक्सेल फाऊंडेशनचे विश्वस्त आहेत.
मॅक्सेल फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाला लाख लाख
शुभेच्छा...!
No comments:
Post a Comment