राज्य परिवहन - यथा
राजा तथा
पार्श्वभूमी : लाल मातीच्या कोकणात काळ्या डांबरी
रस्त्यांची पार दुर्शशा उडालेली आहे. चतुर्थीचे दिवस असल्याने MH 01 ते MH 47 अशा नंबरप्लेट असलेल्या अनेक गाड्या गावोगावी
रस्तोरस्ती उभ्या दिसत असल्या तरी एस. टी. ची वाट पहाणारी मंडळी “आजून कशी एस्टी
इली नाय” असा त्रासिक चेहरा करून कान आणि डोळे तिकडे लावून बसलीय. पवसाची रिपरिप
अधूनमधून चालूच. रडणार्या पोराला रपाटा घालू का नको अशा संभ्रमात आये आहे.
एवढ्यात एस्टी येते. एवढा वेळ चारा-पाचच
वाटणारी पण आता पाच-पंचवीस झालेली मंडळी तुटून पडतात.
“चड चड बाबा, आता चडलस नाय तर मोदी
मंत्रीमंडळात घेवचो नाय” – एक म्हातारा
भराभर सगळे प्रवासी गिळून एस्टी
निघते. आत जागा असूनही बरेच जण उभेच. सिट भिजलेल्या. असो…, या सिट पावसात नायतर कधी
भिजणार? थांबलेला पाऊस पुन्हा बरसू लागतो तसा
छतातून अभिषेक सुरू होतो. या सिट त्यामुळेच भिजलेल्या होत्या तर. “गळकी एस्टी
कळवा, एक हजार रुपये मिळवा’ या घोषणेचं काय झालं असा विचार मनात आला. की आता
त्याचं “धडकी एस्टी कळवा, एक हजार रुपये
मिळवा’” असं झालय? वरचे थेंब चुकवत उभं
राहाण्याची कसरत करीत असतानाच अनंत गचके खात प्रवास सुरू असतो. पाच-सहा किलोमिटरचा प्रवास होतो आणि पत्रा
फाटल्या सारखा जोरदार आवाज येतो.
आता आणि गाडीर काय पडला? असा प्रश्न
पडला असतानाच गाडीवर नाही तर खाली प्रॉब्लेम झाला आहे हे लक्षात येतं. गाडी
थांबवून डायव्हर खाली उतरतो. मागच्या चार टायर पैकी एक पंक्चर झालेला असतो.
आता..............................
असा सवाल सगळ्याच्याच चेहर्यावर वाचता येतो. पुढे तीन तासानी येणार्या एस्टीवरच
आता मदार हे अर्धे अधिक ओळखून असतात.
“वर स्टेपनी आसा पण जॅक नाय” इती कंडक्टर
“चला घेवन तशीच” एक प्रवासी.
प्राप्त परिस्थितीत हळूहळू गाडी
पुढच्या प्रवासाला निघते. मग अनंत सुचना सुरू होतात. वानगी दाखल काही पुढे देत
आहे.
”पाठसून येणारी पांग्रड तरी मिळात,
चला तुमी अशीच कडावलीक जावदे.”
“असे गेलो तर पुढची गाडी कशी
मिळणार? कंडक्टर नुसते काय बसलात? डेपो मध्ये फोन करा,
दुसरी गाडी मागवा, हे
चालणार नाही. कुणी तरी बोललच पाहिजे” इती संतप्त मुंबईकर.
कंडक्टर हू की चू करत नाही. (केलं
तरी त्या खडखडाटात काय ऎकू येणार?)
”आता दुसरं काहीतरी बघितलं पाहिजे,
ओ कंडक्टर आमचे पैसे परत द्या” दुसरा संत्रस्त मुंबईकर.
गाडी कुपवडा-पांग्रड-कडावल
दर्शनाला निघाल्यासारखी डोलत चाललीय. नेहमीचे मुरलेले मालवणी
प्रवासी गप्प बसून
“गाडी न्हेता मा, गप बासाया” असं न बोलताच म्हणत असतात.
कडावल बाजाराच्या अलिकडे गाडी
बाजूला थांबते. सगळे प्रवासी उतरून मागून येणार्या पांग्रड एस्टीची वाट बघत
असतात.
“आता ती भरान इली म्हणजे झाला” इती
याक चेडू.
“हे बघा बाबा, दादा आमका हसतत, कशे
तुमका गंडवलव म्हणान. मायxxxनी फसवल्यानी रे, हे पैशे खातत आणि आमची ही परस्थिती.
हसतत बग तरी कशे, नुसते जायराती ‘सर्वात पुढे आहे हात मारूक माहाराष्ट्रावर माझ्या”
एक अस्सल मालवणी.
“आता नाय येवचे निवडान” दुसरा
“येवन खातले काय, फुटक़ी गाडी”
पहिला.
मागाहून येणारी पाग्रड गाडी येवून
उभी रहाते.
पुन्हा तशीच झुंबड, मंडळी तुटून
पडतात.
असे अंक गावोगावी चालूच आहेत.
No comments:
Post a Comment