मित्रवर्य विजय
मुडशिंगीकर यांनी बुद्धीस्ट सर्किंटमध्ये भ्रमंती करून उत्तम छायाचित्रं काढली,
पण त्याचं कॉफी टेबल बुक तयार करण्यासाठी त्याना कठिण काळातून जावं लागलं. आता
त्यांचा हा प्रकल्प पुर्णत्वास गेला आहे. नुकतच त्याचं प्रकाशनही झालं. त्यांच्या
प्रयत्नांना लाभलेलं यश पाहून उत्सुर्त सुचलेली कविता.
तथागताच्या वाटेवरती बुद्धाच्या देशा
पदस्पर्शाचे पावन दर्शन हीच एक आशा
तू धडपडाला आणि शिणला तरी वर उठला
वाहिला घाम, दिले ते दाम विश्रांती नाही मनाला
करी दर्शन सोपे सकल जनांना आता
तू दावीशी त्यांच्या निज नयनांना त्राता
सत्य शांतीचा धम्म खरा रे आता
दावील मार्ग तो अखिल जगाला पुरता
नरेंद्र प्रभू
१२/०४/२०१६
No comments:
Post a Comment