एप्रिल २०१६ च्या इशान्य वार्तामध्ये
प्रसिद्ध झालेला माझा लेख:

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सध्या देशद्रोहाच्या आरोपाने
खळबळ माजली आहे. डाव्या पक्ष संघटनांनी
आता दिशाभूल करण्याची निती अवलंबली आहे. जो मुद्दा आहे
त्याला बगल देवून भलत्याच विषयावर गदारोळ माजवायचा ही त्याची नेहमीची चाल आहे. इथेही
तेच घडले आहे ज्या डाव्या संघटनांच्या पुढाकाराने तिथे अफ़जल गुरूचे उदात्तीकरण
झाले, त्यावर पोलिसांनी कारवाई केल्याबरोबर त्यानी तात्काळ
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा गळा काढला. डीएसयू चा नेता कन्हय्या कुमार याला अटक
झाल्याबरोबर आदल्या दिवशीपर्यंत वाहिन्यांवर झळकणारा उमर खालीद हा विद्यार्थी नेता
फरार झाला. हा उमर खालीद DSU (डोमोक्राटीक स्टूडंट युनियन)चा नेता DSU ही
कमुनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाची विद्यार्थी संघटना. याच उमर खालीदचा या कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्य
हात होता. उमर खालीदचे वडील सैय्यद कासिम
इलियास हे सिमी या संघटनेचे प्रमुख नेते होते. विद्यापीठात पोलिस आलेच कसे? हा नवा
युक्तीवाद डाव्यांकडून पुढे करण्यात आला आहे. पोलिस या देशातील कायदा व्यवस्थेचे
राखणदार असून, त्यांना कुठल्याही जागी व केव्हाही जाण्याचा अधिकार
देशातील कायद्याने दिलेला आहे. हे विद्यापीठ भारताचा भाग नाही, असे डाव्यांना म्हणायचे आहे काय? बाहेरचे विद्यार्थी इथे येऊ
शकतात मात्र पोलिसांना मज्जाव का करण्यात येतो? देशप्रेमी नागरीकांना छळणारे अनेक प्रश्न या
प्रकरणातून पुढे आले आहेत. या घटनेआधी उमर खालीदने काश्मीर आणि खाडी देशात अनेक
फोन केले होते अशी माहिती उजेडात येत आहे. देशविरोधी कारवाया आणि माओवाद्यांच्या
काश्मीर कनेक्शनचाच हा भाग आहे. आणि स्वतंत्र्य म्हणजे वैराचार नव्हेच. २०१०
मध्ये दंतेवाडा इथं लक्षलवादी हल्ल्यात ७५ जवान शहीद झाले होते तेव्हा याच जेएनयु
विद्यापीठात विजय दिन साजराकरण्यात आला होता ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. देशात
दुर्गापूजा केली जाते तेव्हा इथे महिषासूर पुजाला जातो अशी ही औलाद आहे.
या वेळी “भारत तेरे टुकड़े होंगे, इन्शा अल्लाह इन्शा अल्लाह, अफज़ल हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं, अफज़ल तेरे खून से इन्किलाब
आएगा, भारत की बर्बादीतक जंग रहेगी जंग रहेगी” अशा देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या.
यावर कॉग्रेस सहीत सर्वच विरोधीपक्षांचं म्हणणं आहे की नुसत्या घोषणा देणं म्हणजे
देशद्रोह नव्हे. हे म्हणे अभिव्यक्ति स्वातंत्र्य! हे बुद्धी दिवाळखोरीत निघाल्याचं लक्षण आहे..
माणसाचे तुकडे तुकडे करू म्हणून घमकी दिली तर मात्र ती जिवे मारण्याची धमकी म्हणून
गुन्हा होईल पण देशाचे तुकडे तुकडे करू म्हणणार्याची जिभ हासडून टाकली पाहिजे असं
यांना वाटत नाही. जगात आयसिसचा धोका टोकाला गोलाय, जगाचं कशाला आपल्याच काश्मीरच्या
पंपोरमध्ये अतिरेक्याशी जिवाची बाजी लाऊन
लढणार्या (या चकमकीत सेनादलाचे पाच वीर शहीद झाले) सैनिकांवर काश्मीरमधले नागरिक
एकत्र येऊन दगडफेक करतात आणि बाजूच्या मशीदीमधून अतिरेक्यांचं गुणगान गाऊन त्यांना
पांठिंबा दिला जातोय, ही हिम्मत येते कुठून? तर आपल्याच संसदेवर हल्ला करणार्या
अफजल गुरूच्याबाजूने बोलून आपलेच कॉगेसी खासदार पाकिस्तान आणि दोशद्रोही अतिरेकी
यांना पाठबळ देत आहेत या सारख्या ग़्हटनांमुळे या वोषवल्लीला खत पाणी घातलं जातं.
बरं या अफजल गुरूला आपलंच सरकार असताना फासावर चढवलं गेलं हे पण ते निर्लजपणे
नजरेआड करतात. ही देशविरोधी विषवल्ली वेळीच मुळासकट उखडून टाकली पाहिजे, त्याशिवाय
या देशाला चांगले दिवस दिसणार नाहीत. अतिरेक्यांशी सामना करताना मानवीहक्क,
सहिष्णूता असले मुद्दे दुय्यम ठरतात. लोकशाही समाजव्यवस्था असलेला जगातला सर्वात
मोठा देश असलेल्या भारतातच ही थेरं खपऊन घेतली जात आहेत. ज्या लोकशाहीचा जगात
उदौदो केला जातो त्या अमेरीकेतल्या विद्यापिठात ‘ओसामा हम शर्मिंदा हैं , तेरे क़ातिल ज़िंदा हैं’ म्हणण्याची कुणाची हिम्मत होईल काय? आंधळा मोदी विरोध करणारी ही
मंडळी आता देशाच्या मुळावर उठलीत आणि मोदी पंतप्रधान व्हायच्याआधी हेच लोक त्याना अमेरीकेचा विजा दिला जावू नये
म्हणून अमेरीकेची आर्जवं करीत होते.
अफजल गुरू, कसाबसारख्या अतिरेक्यांना फाशीच्या दोरापर्यंत
नेण्यासाठी आपल्या देशात अनेक वर्षं न्यायालयात संघर्ष करावा लागतो. त्या नंतर असे
काहीच अतिरेकी फासावर लटकवता येतात. आता या अतिरेक्यांचा कळवळा आलेले लोक त्या
न्यायालयांचाही अपमान करीत आहेत. ‘चार-दोन व्यायमुर्तींनी ठरवलं म्हणून अफजल गुरू
दोषी ठरत नाही’ असं उमर खालीद उघडपणे वाहीन्यांवर येऊन सांगतो? भारतीय
व्यायव्यवस्थेला हे लोक किती किम्मत देतात ते यावरून लक्षात घ्यायला पाहीजे. काश्मीरमध्ये
Thank
you JNU चे फलक दाखवणारे आणि इथे दिल्लीत विद्यापिठात वर्षानुवर्ष भारतमातेच्या
अन्नावर पालनपोषण झालेले मावोवादी एकच आहेत. सापाला किती दिवस असं दुध पाजत
बसायचं? काश्मीरमधल्या अतिरेकी कारवाया सुरू होण्याआधी काश्मीर विद्यापिठात
बॉम्बस्पोट झाले होते ही गोष्ट विसरून चालणार नाही.
प. बंगालच्या मालदा मध्ये घडलेली
घटना, मुंबईत रझा अकादमीच्या मोर्चात महिला पोलिसांचा विनयभंग आणि पोलिसांना जिवे
मारण्याचा प्रयत्न अशा घटनांना दंगली या सदरात मोडता कमा नये तर त्या अतिरेकी
कारवाया म्हणूनच त्यावर कारवाई केली पाहिजे न पेक्षा भारताचा सिरीया व्हायला वेळ
लागणार नाही.
पुण्याच्या फ़िल्म संस्थेतील विद्यार्थी आणि जेएनयु मध्ये देशविरोध
घोषणा देणारे विद्यार्थी हे तिथे कित्येक वर्ष ठाणमांडून सर्व सोईसुविधांचा अखंड
लाभ घेत आहेत. अशा विद्यार्थ्यांना किती वर्षे
विद्यापीठामधील वसतीगृहांचा वापर करु द्यावा याचा विचार करण्याची वेळ आता
येऊन ठेपली आहे.
भारत विकासाच्या वाटॆवर आहे हिच खरी तर विरोधकांची दुखरी
बाजू आहे. देश आणि जगभरात हे स्पष्ट होऊ लागताच प्रत्येकवेळी या सकारात्मक
बाबींवरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदीविरोधाला उत आला. त्याची वानगी दाखल
उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.
ओबामांची भारत भेट
- चर्चमधल्या चोर्यांचा चर्चवरचा हल्ला म्हणून गहजब.
भार-आफ्रिका फोरम समिट – बिफवरुन राजकारण
बिहार निवडणूक – पुरस्कार वापसी
पुर्वांचलाचा विकास – रोहित वेमूला आत्महत्येचं राजकारण
मेक इन इंडीया विक – जेएनन्यु कांड
संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या
मुद्द्याला हेतूता हवा देण्यात आली. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून आर्थिक आघाडीवर
अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. मुख्यता अनुदान आणि मनरेगासारख्या योजनामधून
खर्च होणारा केंद्रसरकारचा निधी यांना लागलेली गळती थांबवण्यावर सरकारला यश
प्राप्त होत आहे. नेमकी हीच गोष्ट हितसंबंधी लोकांना खुपते आहे. योजनांमधला निधी
परस्पर हडप करण्याच्या या कारस्थानाला ‘आधार’ आणि जनधन खात्यांच्या मार्फत सरकारने
आळा घातला असताना त्यामुळेच अस्वस्थ झालेली मंडळी ‘असहिष्णूता’, ‘अभिव्यक्ति
स्वातंत्र्य’ असल्या मुद्द्यांची ढाल पुढे करून सरकार अस्थिर सरण्याचा प्रयत्न
करीत आहेत.
क्षुद्र राजकिय स्वार्थासाठी देशविरोधी कारवाया करायच्या आणि विपर्यास करून राज्य घटनेचा
आधार घ्यायचा ही कमुनिस्टांची जुनी रितच आहे. पण आश्चर्य वाटतं ते देशावर
साठवर्षाहून अधिककाळ राज्य केलेल्या कॉग्रेस पक्षाचं. त्यानाही ही विपरीत बुद्धी
का होते? प. बंगाल मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस आणि डावे
यांची युती होणार त्याची परिणीती म्हणून हे नेपथ्य तयार करण्यत आलेले आहे काय? कॉग्रसचे
नेते दिग्विजय सिंग तर निवडणूक जिंकण्यासाठी नक्षलवाद्याची मदत मागतात तर त्याच
पक्षाचे दुसरे नेते मोदींना पराभूत करण्यासाठी पाकमध्ये जावून पाकची मदत मागतात.
कॉग्रेसच्या रिटा बहुगुणाचं म्हणणं
विश्वविद्यालयात तिरंगा फडकावयाचा आदेश देणं लाजिरवाणं आहे. इसरत जहाला थेट
शहीद दर्जा देणारे ते हेच लोक, (शहीद हणूमंतप्पा असतो इसरत जहा नव्हे) युपीए
सरकारच्या काळात डेव्हीड हेडलीने इसरत जहा
आत्मघातकी पथकाची सदस्य होती असं तपास अधिकार्यांना सांगितलं होतं पण केवळ
नरेंद्र मोदींना संपवण्यासाठी तपास अधिकार्याला त्याच्या मुळ राज्यात परत पाठवून
त्या सरकारने ती गोष्ट लपऊन ठेवली. या प्रकरणात अनेक प्रामाणिक अधिकार्याना अनेक
वर्ष तुरुंगात खितपत पडावं लागलं. आता न्यायालयात हेडलेने साक्ष देताना ती गोष्ट
पुन्हा सांगितली तेव्हा जनतेला सत्य समजलं.
ऎशीच्या दशकात सुरूवातीला पंजाबविद्यापीठात चार-पाच टाळकी
खलिस्थानबद्दल बोलताना आढळायची, कालांतरांने ती दहा-वीस, नंतर पन्नास-साठ अशी
संख्या वाढत गेली. सुरवातीलाच तिकडे लक्ष न दिल्याने पुढे देशाला त्याची काय किंमत
द्यावी लागली त्याचा इतिहास ताजाच आहे. हा असा भ्रम निर्माण करून देशाच्या शहरी
भागातही नक्षलवाद पोसण्याचं हे कारस्तान आहे. माओवादी आणि काश्मीरी अतिरेकी यांची
हातमिळवणी झाल्याची ही फळं आहेत. जिथे जी चालतील ती अस्त्र वापरायची दिल्लीत
वैचारीक भ्रम तयार करायचा आणि केरळ, प. बंगालमध्ये मुडदे पाडायचे.
एकूण काय ‘खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट’
शिवरायांनासुद्धा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वधच करावा लागला होता. प्रसंग
बाका होता आणि............. आताही आहे.
नरेंद्र प्रभू
सांताकृझ, मुंबई
No comments:
Post a Comment