19 May, 2010

द म्युझिशियन्स सा रे ग म प


संगीताने आपलं जीवन किती सुरस बनवलय. गाता गळा आणि फुललेला मळा ही तर निसर्गाचीच देणगी. एखादी सुंदर तान ऎकताक्षणी वाह...! क्या बात है....!  असे उद्गार नकळत बाहेर येतात. पण या गाण्याला जर संगीताची साथ नसेल तर......? तर ते गाणं तेवढं सुश्राव्य नक्कीच होणार नाही. किंबहूना गाणार्‍यालाही वाद्यांची साथसंगत खुप महत्वाची असते. सुरातालात गाणं सादर करण्यासाठी हे वादक कलाकार किती महत्वाचे असतात हे झि मराठीच्या सा रे ग म प च्या कलाकारांपासून ते पं. सुरेश वाडकर, वैशाली सामंत, अवधुत गुप्ते आणि संगीतकार अजय अतुल डॉ. सलील कुल्कर्णी हेच जास्त चांगलं सांगू शकतील. झि मराठीवर सा रे ग म प सुरू झाल्यापासून जे वादक कलाकार साथसंगत करीत आहेत त्यांनी सगीत क्षेत्रातील दिग्गजांची तर वाहवा मिळवली आहेच पण ते आपल्या कलेच्या जोरावर अवघ्या मराठीमनावर अधिराज्य गाजवत आहेत आणि आज मराठी माणसाच्या घराघरात पोहोचले आहेत.

 हे झि  सा रे ग म प चे गुणी कलावंत द म्युझिशियन्स ही वाद्यमैफल गेले काही दिवस रसिकांसाठी सादर करीत आहेत. आल्पावधीतच या कार्यक्रमाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग आज पार्ल्याच्या मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सादर होत आहे. महेश खानोलकर (व्हायोलिन), अमर ओक (बासरी), सत्यजित प्रभू (किबोर्ड,अँकॉर्डीयन, पियानिका), आर्चिस लेले (तबला), निलेश परब (ढोलक, ढोलकी, जेम्बे), दत्ता तावडे (ड्रमसेट, ऑक्टोपॅड) असे एकापेक्षा एक मातब्बर वादक असून पुष्क़र श्रोत्री यांच्या निवेदनाने कार्यक्रमला अधिकच बहार येईल. या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग मी पाहिला आहेच. आज हा पन्नासावा प्रयोग पाहिन आणि नंतर या प्रत्येक कलाकारावर पोस्ट लिहिन म्हणतो. तो पर्यंत सा....रे... ग... म... प...              

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates