07 August, 2010

शो मस्ट गो ऑन...!मन मानत नाही तरी चार दिवसांपूर्वी माझा प्रिय मित्र चेतन जानी गेला ही गोष्ट खरी आहे. तो निघून गेला पण मागे उरलेल्यांना त्यांचं काम केलच पाहिजे. किंबहूना अधिक जोमाने काम केलं पाहिजे. अंत्यविधीला जाऊन आलो, नातेवाईकांना भेटून आलो. पुढच्या आठवड्यात चाळीस जणांना घेऊन सहलसाठी म्हणून लेह-लडाखच्या टूरवर जायचं म्हणून तयारीला लागलो (म्हणजे कामं आटोपायच्या) तर ती ढगफुटीची बातमी आली. पहिल्यांदा काहीच संपर्क होत नव्हता. नेमकं काय झालयं? कुठे झालय? दुरदर्शन वाहिन्यांवर दाखवतात तेवढं त्याला महत्व द्यायचं काय? (चलचित्र लेहची आणि बाकी भाष्य स्टुडीओमधलं अशी तर्‍हा असते.) दुरदर्शन आणि आकाशवाणी वरच्या बातम्या ऎकलेल्या बर्‍या. अशा अवस्थेत कालचा दिवस काढला. आज मात्र लेहला फोन लागले. आमचा मित्र पद्मा सुखरूप आहे. नव्या लेह शहराला त्या ढगफ़ुटीची झळ पोहोचलेली नाही हे समजलं. कारगील-लेह हा राष्ट्रीयमहामार्ग निमू गावाजवळ पूल वाहून गेल्याने बंद आहे हे समजलं. दुसरीकडे लेह-मनाली हा मार्गही बंद आहे. पण हे दोन्ही मार्ग दोन दिवसात सुरू होतील, ब्रोची माणसं कामाला लागली आहेत. लेह मध्ये सामान्य नागरीकांपेक्षा सैनिकच अधिक आहेत, शिवाय सीमावर्ती भागाशी संपर्क तुटलेला ठेवणं देशाला परवडणारं नाही. थोडक्यात परिस्थिती चार दिवसात पुर्ववत होईल. ज्या आमच्या मित्राचा मी वर उल्लेख केला त्या पद्मा च्या घरातही पाणी शिरलं, शेतीवर चिखल चढला. तो स्वतः त्या परिस्थितीतून सावरला आहे आणि आम्ही तिकडे येणार म्हणून वाट बघत आहे. सब ठिक हो जायेगा आप आ जाओ असे त्याचे धीराचे शब्द आहेत मी स्वतः Wait and Watch’ पेक्षा ‘Show Must Go On’ वर विश्वास ठेवतो. बारा ऑगस्टची बँच जाणारच.          
       

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates