नुकत्याच झालेल्या अंदमान सहलीदरम्यान डॉ. अरवींद किबेंचा मी रुमपार्टनर होतो. चेन्नईच्या हॉटेल मध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली आणि पुन्हा परतीच्या वाटेवर चेन्नई विमानतळावर त्यांचा निरोप घेताना खुप जुन्या ओळखीच्या सहृदयाची ताटातूट होत आहे अशी भावना निर्माण झाली. तसे डॉ. किबे ऎशी वर्षाचे, वयाने, पेशाने, ज्ञानाने आणि सर्वार्थानेच मोठे असलेल्या डॉ. किबेंनी मात्र ते मला त्या सहा दिवसांच्या सहवासात कधी जाणवू दिलं नाही. रुममध्ये असताना अनेक विषयांवर चर्चा झाल्या, आध्यात्मावर तर रोजच त्यांचे मौलिक विचार ऎकायला मिळत. वैद्यकीय व्यवसाय, राजकारण, खेळ, पर्य़टन, योग आणि अध्यात्म सर्वच विषयांवर त्यांचा अभ्यास आणि आवड याचा मला प्रत्यय आला. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केलेलं द्विशतक त्यांनी एखाद्या लहानमुलाच्या उत्साहाने साजरं केलं आणि हॅवलॉकला रात्रीच्या निवांत वेळी सागर किनारी तपस्व्यासारखी ध्यानधारणा केली. या वयातही असं समजून, समरसून जगणं आणि छोट्या-छोट्या तर नाहीच पण जगाच्या द्रुष्टीने मोठ्या दुःखाचाही बाऊ न करता ते वर्तमान कसा जगत आहेत हे जवळून पाहणं हा खरच एक सोहळा होता.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
No comments:
Post a Comment