‘गंगाजल नॅचर फाउंडेशन’ ची ‘जन जोडो गंगा यात्रा’ आज गंगोत्रीजवळील मुखवा या ठिकाणाहून सुरू होते आहे. गेली आठ दहा वर्ष गंगा नदी आणि तीचे शुद्धीकरण हा एकच ध्यास घेतलेल्या विजय मुडशिंगीकर यांच्या नेतृत्वखालील सात जणांचा एक चमू दोन दिवसांपुर्वीच मुंबईहून निघाला असून, मुखव्यापासून अनेक स्थानिक गंगाप्रेमी नागरीक या यात्रेत सहभागी होणार आहेत. गेली पाच वर्ष श्री. मुडशिंगीकरांनी गंगेचं सुंदर त्याचबरोबर विद्रूप झालेलं रुप छायाचित्रांच्या माध्यमातून भारतातच्या विविध भागात मांडलेलं आसून आता गोमुख ते गंगासागर असे २५२५ किलोमीटर अंतर कापून गंगाकाठच्या गांवा-गावात आणि शहरांमधून जनजागृती करून गंगेच्या प्रदूषणाला आळा बसावा म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत.
यापुर्वी विजय मुडशिंगीकरांनी गंगेच्या किनारी तीसपेक्षा जास्तवेळा जावून छायाचित्र काढली आहेत, त्या त्यांच्या अनुभवावर आधारीत ‘पंचगंगा ते गंगा व्हाया मिठी’ हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. गंगेच्या शुद्धीकरणासाठीच्या आणखी एका प्रयत्नाला यश लाभो अशी इश्वर चरणी प्रार्थना.
‘गंगाजल नॅचर फाउंडेशन’ च्या ‘जन जोडो गंगा यात्रे’ला माझ्या आणि माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !!!
ReplyDeleteश्री. विजय मुडशिंगीकर आणि त्यांच्या टिमचे यानिमित्ताने अभिनंदन !!!
राजेश जी. गाडे
संस्थापक व मुख्य संयोजक
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली