आज थिंक महाराष्ट्र (thinkmaharashtra.com) हे संकेतस्थळ इंटरनेटवर अधिकृतपणे अवतीर्ण होत आहे. जेष्ठ पत्रकार आणि गंथालीचे श्री. दिनकर गांगल यांच्या नेतृत्वाखाली हे संकेतस्थळ तयार झाले आहे. महाराष्टीय समाजातील चांगुलपणा आणि गुणवत्ता यांचे नेटवर्कींग करावे आणि त्याद्वारे समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे यासाठी गेले काही महिने काही तरूण व अनुभवी ज्येष्ठ मंडळी एकत्र येवून विचारविनिमय करत होती त्यातून थिंक महाराष्ट्र डॉट ऑर्ग या प्रकल्पाचा जन्म झालेला आहे.
आज शुक्रवार ५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मुंबई येथील दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात थिंक महाराष्ट्र डॉट ऑर्ग इंटरनेटवर अवतरणार आहे. याच कार्यक्रमात ‘ब्लॉग, वेब माध्यम आणि मराठी’ या विषयावर एक परिसंवाद होणार असून त्यात संजीव लाटकर, अतुल तुळशीबागवाले, माधव शिरवळकर, रामदास बिवलकर आणि तात्या अभ्यंकर सहभागी होणार आहेत.
No comments:
Post a Comment