अतीशय कठीण परिस्थीतीतून चातुर्याने मार्ग काढून कुटुंबाचं पर्यायाने समाजाचं जगणं सुकर करणार्या स्त्रीया आपण रोजच पहातो. नैसर्गिक मर्यादांमुळे अबला म्हणून गणला गेलेला स्त्री वर्ग आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर गगनाला गवसणी घालताना दिसतो. कालच मुंबई ते न्युयॉर्क या एअर इंडीयाच्या विमान प्रवासात पायलट पासून सर्व विमान कर्मचारी आणि प्रवाशी फक्त महिला होत्या, हा विक्रमही महिलांनी करून दाखवला. एव्हरेस्ट सर करणारी कृष्णा पाटिल असूदे नाहीतर अंटार्टिकावर १५ महिने राहून आलेल्या डॉ. देवयानी बोरोले असूदे स्त्री शक्तीचा हा वावर आता आपल्याला सर्वच क्षेत्रात दिसतो आहे. आज पर्यंत पडद्याआड असलेली किंवा जाणीवपुर्वक ठेवलेली ही शक्ती आता खर्या अर्थाने कामी येते आहे.
या पार्श्वभुमीवर गेली १४ वर्षं संसदेत अडकलेलं महिला आरक्षण विधेयक काल पास होईल असं वाटत असतानाच बैल बाजाराला लाजवेल एवढ्या उन्मत्तपणे त्याला विरोध करण्यात आला. लालू , मुलायम, शरद या यादवांनी आणि त्यांच्या बगलबच्चांनी दांडगाई करून महिला आरक्षण विधेयक रोखलं. याच लालूने राबडीदेवीच्या खुर्चीआड राहून राज्य केलं तेव्हा त्याला लाज वाटली नव्हती हे विशेष. आज सदर विधेयक पास होईल अशी आशा करूया नव्हे तसे झाले पाहिजे.
No comments:
Post a Comment