रंगावरती रंग घासूनी
पेल्यावरती पेला
सरली रजनी, सरली मदिरा
पायांमध्ये झेला
ती कुठे उर्वशी, कुठली रंभा
काहीच आकलेना
गालावरचे रंग उडाले
दर्पणी पहावेना
रंग उषेचे क्षितिजावरती
अधीर अंगणी ललना
हिंदोळ्यावर खिदळत होत्या
सांजपर्या सुखवदना
ते रंग खरे की हे रंग खरे?
संशय का मनी आला?
दिनमणी उदया अस्ता येता
संभ्रम सरूनी गेला
नरेन्द्र प्रभू
अप्रतिम! छायाचित्र व वर्णन दोन्ही सुरेख!!
ReplyDeleteअरुंधती
--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
अरुंधती नमस्कार, प्रतिक्रीयेबद्दल आभारी, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
ReplyDeleteअसं म्हणतात की एका म्यानात दोन तरवारी राहत नाहीत. पण तूमच्यात, तरल मनाचा कवी अन् चपळ छायचित्रकार दोघेही वास करुन आहेत. आपली कवीता तर छान आहेच पण् त्याहून छायाचित्र अतिसुंदर आहे. खुपच छान ! keep it up !
ReplyDelete