केसांची किंमत २५0 कोटी
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानला वर्षभरात भाविकांनी वाहिलेल्या केसाचा ई -लिलाव करून २५0 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. http://bit.ly/ZuhkdM
देवस्थानांना मिळालेली देणगी व लिलावातील रक्कम गरीब जनतेच्या हितासाठी वापरावी, असे आपल्याला वाटते का?

लोकमतच्या फेसबुक वर हा प्रश्न विचारला होता तो वाचून मला सुचलेली ही कविता:
तूझे कितीक देव्हारे
देवा आज मांडलेले
दह्या दुधाचे सागर
असे, लाख सांडलेले
आला सोन्याचाही पूर
नसे अत्तरा कसर
माती पाण्याला पारखी
तूझ्या दयेच्या सारखी
तूझ्या तान्ह्या बालकाला
नसे टिपूस पाण्याचा
असे बाजार मांडला
बडव्यांनी रे भक्तीचा
पाप ताप सरो म्हणूनी
केला अहेर चोरीचा
तू आहे कारे तिथे ?
की देखावा मायेचा?
नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment