मुंबईस्थित तरुण शिल्पकार रोहन पवार आणि कोकणातले चित्रकार संदिप ताम्हणकर आणि किरण घाणेकर यांच्या अलिकडच्या काळात साकार झालेल्या शिल्पकृती आणि चित्रांचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात आलं आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २९ एप्रिल २०१३ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.
कोकणातच कलेचे धडे गिरवलेले हे गुणी कलाकार मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत प्रथमच आपल्या कलेचं सादरीकरण करीत असून आज पहिल्याचं दिवशी कलारसिकांनी जहांगीरच्या
कलादालनात गर्दी केली होती.
विशी नुकतीच ओलांडलेल्या रोहन पवारने प्रदर्शनात मांडलेल्या शिल्पकृती या कसलेल्या शिल्पकाराच्या तोडीस तोड असून हा शिल्पकार यशाचं एव्हरेस्ट नक्कीच गाठेल या बद्दल शंका उरत नाही. अधीरतेने वाट पाहणारी तरूणी, तल्लीन होऊन मृदूंग वाजवणारे लोककलाकार, आळस देणारी मांजरी, नाव हाकणारा नावाडी, शुभ संकेत देणारा हात, मान वाकडी करून अंग साफ करण्यात गुंग झालेली कबुतरं अशा अनेक शिल्पकृती साकार करताना रोहनने फायबर, ब्रांझ, संगमरव्हर, लाकूड, धातू, दगड अशा अनेक माध्यमांचा वापर केला आहे. प्रत्येक शिल्पं हे आपली नैसर्गीक लय साधून अवतिर्ण झाल्याचा भास होणं हे या कलाकाराचं यश आहे आणि ती हातोटीच त्याला कलाक्षेत्रात उच्च स्थानी घेऊन जाईल. रोहन सारख्या उपजत कलाकाराची कला पाहण्याची
ही सुवर्णसंधी कलारसिकांनी घ्यावीच.
No comments:
Post a Comment