शरद तावडे या
प्रथितयश चित्रकाराने कैलास मानसरोवराची यात्रा करून ‘यात्रा’ या आपल्या चित्रप्रदर्शनाव्दारे मुंबईकरांना कैलासची परिक्रमा
करण्याची उत्तम संधी प्राप्त करून दिली आहे. वरळी इथल्या नेहरू
सेंटर आर्ट गॅलरी, डिस्कव्हरी ऑफ इंडीया बिल्डींग, डॉ. ऍनी बेझंट रोड, वरळी, मुंबई
४०० ०१८ या ठिकाणी ३० एप्रिल ते ६ मे २०१३ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या
वेळात सदर प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनाशुल्क
खुलं राहील.
चित्रकार - शरद तावडे |
कैलास मानसरोवर
मला नेहमीच खुणावत आलंय. इथली शिखरं ही तशी तपस्वीच. शिवशंकराचं हे कैलास प्राप्त करण्यासाठी
कैलासवासी व्हावं लागतं, म्हणजे मरण आल्यावरच आपण तिथंपर्यंत जावू शकणार अशी धारणा
असल्याने असेल कदाचीत निधन झाल्यावर त्या व्यक्तीचा उल्लेख कैलासवासी म्हणून करतात.
दळणवळणाची साधनं नसतना कुणी कैलासला गेला तर तो परत येणं कठिण. आजही या जेट युगात कैलासला
पोहोचणं सोपं झालं असलं तरी तिथे एवढ्या उंचीवर जावून परिक्रमा करणं किंवा मनाजोगते
फोटो काढणं फारच कठिण काम आहे. तर असा हा कैलासचा खडतर प्रवास करून माझे मित्र शरद
तावडे यांनी तिथली अप्रतिम चित्रं काढली आणि मनात भरून आणलेला कैलास कॅनव्हासवर मोकळा
केला.
No comments:
Post a Comment