आज मोकळे आकाश
रवी सुखाऊन गेला
पडे पिठूर चांदणे
शशी हसाया लागला
आज मोकळे आकाश
तारकांची लयलूट
चहू दिशांना आरास
मनी चंदेरी प्रकाश
आज मोकळे आकाश
शितल वार्याचा गारवा
मनमोर नाच करी
अंतरात वाजे पावा
आज मोकळे आकाश
भाळा वरली निळाई
जणू पदर आईचा
तीच गातसे अंगाई
नरेंद्र प्रभू
धन्यवाद, साहेब. ही कविता तुम्हाला सुचल्याबरोबर मला ऎकवल्याबद्दल. मनातील मळभ दूर झाले.
ReplyDelete