बालदिना निमित्त ही कविता छोट्या दोस्तांसाठी.
हत्ती हत्ती मोठ्ठा किती !
हत्तीला पाहून वाटते भिती
एवढीशी मुंगी, तीच नाव चिंगी
हळूच येऊन मारते नांगी
खादाड मनीमाऊ, करते म्याव म्याव
स्वयंपाकघरात घुसून, दुध पिते राव !
सश्याचे कान, जिराफाची मान
वाघाचे पंजे, उंटाची कमान
कित्ती सुंदर हे सगळे प्राणी
आम्ही गातो त्यांची गाणी
very nice poem !
ReplyDeleteगीतांजली, नमस्कार.
ReplyDeleteआपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.