नयनरम्य अशा समुद्र किनार्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात गेल्यावर बोंडला अभयारण्याला अवश्य भेट दया. फक्त आठ चौरस किलोमीटर एवढाच व्याप असला तरी प्रदुषण मुक्त असलेला हा भाग अवर्जून पहावा असाच आहे. दाट जंगलाने वेढलेलं पच्छिम घाटातलं हे अभयारण्य रानगवे आणि सांबरांसाठी प्रसिद्ध आहे.
वळणावळणाच्या वाटेवरून जाताना मध्येच नदीचा प्रवाह दिसतो आणि शेवटी आपण या अभयारण्यातील प्राणी संग्रहालया जवळ पोहोचतो. या प्राणी संग्रहालयात पट्टेरी बाघ, बिबळ्या, गवे, सांबर, अस्वल, मोर आदी प्राणी-पक्षी कुंपणाआडच्या मोकळ्या जागेत हिंडताना पहायला मजा येते. उत्तमप्रकारे तयार केलेला बगीच्या हे या अभयारण्याचं आणखी एक वैशिष्टय, पण गजांतलक्ष्मी, वेतोबा वगैरे पुरातन मुर्ती आपलं लक्ष वेधून घेतात.
प्रदुषण मुक्त भाग असल्याची साक्ष देणारी एक प्रकारची बुरशी |
गोव्यातील फोंडा तलूक्यात हे अभयारण्य असून, मडगाव रेल्वे स्टेशनपासून ३६ किलोमीटर अंरतावर आहे. पणजी-बेळगाव राष्टीय महामार्गावरून (4A) उसगाव जवळच्या फाट्यावरून इथे पोहोचता येते. इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी उघडे असणारे हे अभयारण्य दर गुरूवारी बंद असते. स्वत:चे वाहन घेऊन या ठिकाणी सहज जाता येते.
गजांतलक्ष्मीची मुर्ती |
बोंडला अभयारण्याचा परिचय आवडला,जमेल तेव्हा गेले पाहिजे.
ReplyDeleteगोव्याला गेलात तर नक्की जाच. तुम्हाला मजा येईल. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.
ReplyDelete