एकच धागा
परस्परांना जोडूनी जेव्हा जातो
ह्रदयाचे मिलन
करूनी तयांचा मिलाप तेव्हा होतो
ह्रदबंध तक्षणी
अतूट नाते, सहोदरांचे होते
किती तरल भावना
या ह्रदयीची त्या ह्रदयी ती जाते
मग, फुटती निर्झर
द्रवती हृदये
लोण्याहून मऊ होती
जी, वैशाखातील ढेकळापरी होती
नरेंद्र प्रभू
ह्या कवितेचा धागा खरोखरच जोडून गेला. मैत्रीच्या धाग्याला योग्य तो न्याय दिल्याबद्द्ल धन्यवाद.
ReplyDeleteहोतं असं कधी कधी ।
ReplyDeleteगंतून जातो अगदी ।