भेटशील का पुन्हा एकदा अवचित येऊन संध्याकाळी?
कळ्या कधीच्या वाट पाहती सजून येतील रानोमाळी
कुपीत लपऊन सुगंध मनीचा मीही बसलो भलत्या वेळी
वाट पाहाया नकोस लावू झडकरी येऊन दे मज टाळी
उने लालिमा घेऊन जातील संधी आहे संधिकाली
दहा दिशातून पसरत जाईल रात अहा ही तलम काजळी
चंद्र साजिरा हासत येईल रूप न्याहाळील पाणवठ्यावर
चांदण्याचा अंगरखा बघ किती पसरला आहे दूरवर
उमललीच बघ फुले सुगंधी वाट पाहाया नको ग लवूस
बहर असा हा नसतो राणी सदा,
उद्याचे कुणास ठाऊक?
नरेंद्र प्रभू