टेरर फंडीगला मोदी सरकारने जोरदार दणका दिला आहे. श्रीनगर मध्ये वर्षानुवर्षं ठाण मांडून बसलेल्या आणि पाकिस्तानच्या पैशावर पोसल्या गेलेल्या दहशतवादाला नेस्तनाबूत करण्यासाठी टेरर फंडीगचा माग घेण्यासाठी सरकारने कृती गट स्थापन केला आहे.
मोदी सरकारच्या याच धोरणाला
आता यश येत असून सक्त वसूली संचालयाने (ED) काल फुटीरतावादी नेता शाबीर शाह याची श्रीनगरमधील संपत्ती
जप्त केली आहे. त्याला हाफिज सईदकडून पैशांचा पुरवठा होता होता. चौदा वर्षे जुन्या
दहशतवाद
अर्थपुरवठा व काळ्या पैशाच्या
प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.
जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या
श्रीनगर येथील रावळ पोरा भागात एफंडी बाग येथे शहा यांची मालमत्ता असून ती जप्त
करण्याचे आदेश सक्तवसुली संचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दिले
होते. सरकारने सध्या काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर कारवाईचा
वरवंटा फिरवण्यास सुरूवात केली असून त्यात दहशतवादाच्या
आर्थिक नाडय़ा तोडण्याचा हेतू आहे. शाबीर शाह व त्याची पत्नी यांच्या नावे २५.८
लाख रूपये किमतीचे हे घर असून ते जप्त करण्यात आले आहे. शाह हा सध्या न्यायालयीन
कोठडीत असून त्याचा अनेक बेकायदेशीर
कारवायांत हात आहे. त्याचा साथीदार महंमद अस्लम वाणी हा जैश ए महंमद या दहशतवादी
संघटनेचा सदस्य आहे. शाह हा वाणी याच्या माध्यमातून हवालाचा पैसा गोळा करीत होता.
हा पैसा पाकिस्तानातून येत होता.
सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे, की १९९९ मध्ये त्याच्या
सासऱ्यांनी हे घर त्याच्या नावाने खरेदी केले होते. नंतर ते शाह याची पत्नी व
मुलींना त्याच्या मेहुणीने भेट म्हणून दिले. शाह याचे सासरे व मेहुणी याना या
घरासाठीचे पैसे कुठून आणले याचे स्पष्टीकरण करण्यासाठी बराच अवधी देण्यात आला
होता. चौकशीत असे निष्पन्न झाले, की शाह हा या मालमत्तेचे खरा मालक असून त्यालाही सासऱ्याने हे घर कुठल्या
पैशातून घेतले हे सांगता आले नाही.
हाफिज सईदकडून
पैशांचा पुरवठा
शाबीर शाह हा जागतिक दहशतवादी हाफिज सईद
याच्या संपर्कात होता व त्याच्याकडून दहशतवादी कारवायांसाठी पैसे स्वीकारत होता. अनेक
संशयास्पद व्यवहार करून त्याने मालमत्ता जमवल्या असून शाह व वाणी यांना २०१७ मध्ये
सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. वाणी याला जानेवारी २०१९ मध्ये जामीन
मिळाला आहे. ऑगस्ट २००५ मध्ये दिल्ली पोलिसांनी वाणी याला शाबीर शाह यांना २.२५
कोटी रूपये हवालामार्गे दिल्याच्या आरोपावरून अटक केली होती.