05 September, 2009

माझे शिक्षक

आज बर्‍याच महिन्यांनंतर सामंतबाईना फोन लागला. खुप बरं वाटलं. आज शिक्षक दिन म्हणून नव्हे तर कायमच त्यांची आठवण येते. समोर असलेला प्रत्येक विद्यार्थी शिकलाच पाहिजे अशी कळकळ असलेले आमचे शिक्षक, उपलब्ध साघन सामुग्रीचा योग्य वापर करून आम्हाला शिकवीत तेव्हा कदाचीत मला त्याचे महत्व समजले नसेल, पण आता माझी मुलगी शाळेत जायला लागली तेव्हा आताच्या बाजारू शिक्षणाशी तुलना करता तेव्हा आम्ही जे शिकलो ते ज्ञान देणारे आमचे शिक्षक खरोखरच गुरू होते. ताप आला म्हणून चार दिवस शाळेत गेलो नाही म्हणून पाच मैलांची पायपीट करत मला घरी पहायला आलेले मंडपे सर, आमची किती काळजी घेत. शिक्षकांचा बावन्न दिवसांचा संप सुरू असताना हजेरी पुस्तकावर सही न करता शाळेजवळच्या देवळात आम्हा मुलांना शिकवलं, म्हणूनच आम्ही दहावीत चांगले मार्क मिळवू शकलो. गणिताच्या तासाला मला वर्गात न बसवता स्टाफरूम मध्ये आपल्या जागेवर बसवून प्रश्नपत्रिका सोडवून घेणारे नाईक सर मला नेहमीच आठवतात. या अशा शिक्षकांमुळे अभ्यासातली गोडी टिकून राहिली आणि मग पुढच्या आयुष्यात प्रगती झाली. त्या गुरूवर्यांना साष्टांग दंडवत.

1 comment:

  1. श्री नरेंद्र प्रभू : तुमच्याजवळ एक खास नज़र आहे, म्हणून तुमचं लेखन वाचण्यात आनंद असतो. पण इथे काही प्रतिक्रिया नोंदवली तर ती बरेचदा थोड्या वेळानी गायब होते.

    शिक्षणाच्या बाज़ारुपणाला शिक्षकांच्या प्रसिद्ध संपाच्या वेळीच सुरवात झाली होती. नेहमी सुट्टीत इतकं ऊन असतं की क्रिकेट दिवसभर खेळायची सोयच नसते. संपात आम्ही सकाळी सिम्पसनच्या पराक्रमाची आणि गावस्करच्या तीन लागोपाठच्या शतकांची वर्णनं ऐकायचो, आणि नंतर ५४ दिवस पूर्ण वेळ क्रिकेटच्या मैदानावर. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तेव्हा 'आदर्श' म्हणता येईल असे बरेच शिक्षक होते. आता ती संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. पण या अधोगतीला सुरवात फार आधीपासून झालेली आहे.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates