चिऊ-काऊची गोष्ट तुझी ती
अजुन माझ्या कानात
पक्षांमागे धावत तेव्हा
तू जाशी त्या रानात
माडीवरची सर्व पुस्तके
तुझ्या कोवळ्या हातात
तो शिवाजी, ते ज्ञानेश्वर
तुझे सवंगडी होतात
बाजीरावाच्या पुण्यात जेव्हा
तुझा शुभंकर पाय पडे
कर्तुत्वाचा डंका, लंका
हात जोडूनी तुझ्या पुढे
आयुष्याच्या त्या वळणावर
प्रिया भेटली कधी न कळे
शरदाच्या चांदण्यात फुलती
नवीन नाती तुझ्या मुळे
नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment