काल मला एक धमकीचा SMS आला. “ सत् नाम, वाहेगुरू ! हा SMS गोल्डनटेंपल मधून पाठवला आहे. याचा आदर कराल तर तुम्हाला उद्याच एक चंगली बातमी समजेल. मात्र अनादर केला तर पुढची नऊ वर्षे संकटाचा सामना कराल. हा SMS बारा लोकांना पाठवा.” अशा अर्थाचा हा SMS होता.
या पूर्वीही साईबाबा, तिरूपती इत्यादीच्या नावाने असे SMS आलेले आहेत. गम्मत अशी की पूर्वी पत्र पाठवा किंवा पत्रकं वाटा म्हणून असेच संदेश दिले जायचे. आता या तथाकथीत आध्यात्मिक लोकांचीही तांत्रिक प्रगती झालेली दिसते. त्यांचं असूदे पण MBA, इंजिनीअर अशी मंडळी सुद्धा असल्या गोष्टीला बळी पडतात आणि असले SMS फॉरवर्ड करतात तेव्हा मात्र त्यांची कीव कराविशी वाटते. अरे या कावळ्यांचा श्रापांनी मरायला आम्ही काय कच्च्या गुरूचे चेले आहोत ? ( कावळ्यांचा बिचार्यांचा काय़ दोष ? असो.) असली थोतांडं करायला काय माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार झालाय ? मनःशांती साठी हव तर हवा तो जप करा. पण असल्या जाळ्यात फसू नका. त्याने झालाच तर तोटाच होईल तुमचा आणि मोबाईल सेवा पुरवणार्या कंपन्यांचा फायदा. किंबहूना ही त्या मोबाईल सेवा पुरवणार्या कंपन्यांचीच क्लुप्ती असावी. तेव्हा मित्रहो, सावधान.
Agadi barobbar.
ReplyDelete