प्रसाद नागेश घाडी. ज्याला देव ‘पाठीचा कणा’च द्यायला विसरला असं बाळ. कुठलीही शारीरिक
हालचाल करायची असली तरी त्याच्या दुसर्याच्या आधाराची गरज भासायची. ताठ मानेनं
बसण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना त्याच्या काखेत हात घालून, त्याच्या शरीराची वर-खाली
हालचाल करून पाठीचे मणके एकात एक घट्ट बसले आहेत याची खात्री करून, पाठीचा कणा
ताठ करून मगच त्याला बसवावं लागायचं. अशा या मुलाला त्याच्या आई-वडीलानी एवढ्या
जिद्दीने वाढवलं की त्याला तोड नाही. मानेखाली जवळ जवळ लुळा असलेल्या प्रसादला त्याच्या
एकवीस वर्षांच्या आयुष्यात या माय-बापाने क्षणाचंही अंतर दिलं नाहीच पण त्याच्यातील कला
गुणाना ओळखून त्याच्या प्रतिभेला वाट करून दिली. या अशा जीवनाचंही त्याने कसं सोन केलं बघा.
प्रश्नेत्साहन दिलं. प्रदीप जोशींकडे तो शास्त्रीय संगीताचे धडे घेऊ लागला.
चौपाटी समोरच्या बालभवनमध्ये चित्रकलांच्या स्पर्धेत भाग घेऊ लागला. चित्र काढता काढता,
गाणी गाता गाता, छोटय़ा-छोटय़ा कविता करता करता, त्याच्या शिक्षिका आईने,
त्याच्यात ‘ऐकण्याची आवड’ निर्माण केली.
सलग दोन - तीन तास हातात पेन्सिल धरू न शकणाऱ्या प्रसादने लेखनिकाच्या मदतीने
दहावी शालांत परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवले.
लहानपणी इतिहासाच्या अभ्यासातल्या गडांची प्रत्यक्ष माहिती व्हावी. म्हणून त्याच्या वडिलांनी
त्यालाखांद्यावर बसवून ‘प्रतापगड’सुद्धा चढून पार केला.
आपल्या गाण्याच्या जोरावर आणि जिद्दीच्या जोरावर, दुबईच्या महाराष्ट्र मंडळाचं सन्माननीय
आमंत्रण स्वीकारलं आणि आपल्या आई-वडिलांनाही परदेशवारीचा आनंद उपभोगू दिला.
कलेच्या साधनेमुळे रु. ५०,००० चा मानाचा ‘नॅशनल अॅबिलिटी’ पुरस्कारही पटकावला.
आजच लोकसत्ता मध्ये प्रसाद बद्दल वाचले... खरच खूपच मोठे आई वडील लाभले प्रसादला...आणि आई वडिलांना पण प्रसाद सारखा एकमेव मुलगा...
ReplyDeleteHats off to his parents.
ReplyDeleteGreat!!!
ReplyDeleteGreat!!!!
ReplyDelete