काल सर्व वाहिन्यांवर ९/११ च्या संदर्भातल्या बातम्या दाखवल्या जात होत्या. त्या हल्ल्या नंतरच अमेरिकेने अफगाण, इराकी नागरिकांना देशोधडीला लावलं. आता पाकिस्तानची वेळ आली असावी. दहशतवाद, प्रदुषण सगळ्याच बाबतीत दुसर्यांना शहाणपणा शिकवणार्या अमेरिकेला आपल्या दिव्याखालचा अंधार दिसत नाही काय? आज ब्य़ुटी अँन्ड दी बीस्ट हा राणी दुर्वे यांचा लोकसत्ता मधला लेख वाचला आणि हा ब्लॉग लिहावासा वाटला.
३ डिसेंबर २००९ रोजी भोपाळ विषारी वायुकांडाला २५ वर्षे होतील. तेव्हा वीस हजारांवर लोकं मरण पावली तर किमान साडेपाच लाख लोक कायमचे अपंग झाले. त्या भीषण दुर्घटनेनंतर जन्माला आलेली कित्तेक मुलं ही शापीत म्हणूनच जन्माला आली आणि पुढचं भयंकर आयुष्य आजही जगत आहेत. सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवूनच युनियन कार्बाईडचा कारखाना चालू होता. ती अक्षम्य चुक घडल्यानंतरही ना कंपनीच्या अमेरिकन अधिकार्यांना काही शिक्षा झाली ना पिडीताना पुरेशी मदत मिळाली. वर दाखवलेल्या छायाचित्रात जे दुर्दैवी बालक दिसतय तशी कितीतरी लोकं त्या पाशवी हत्याकांडाचे घाव सोसत आजही जगत आहेत त्याची लाज ना अमेरिकेला ना आपल्या राजकारण्यांना. याना लादेन पाहीजे पण युनियन कार्बाईडचा त्या वेळचा अध्यक्ष वॉरेन अॅंडरसन अजून सापडत नाही.
नरेन्द्र प्रभू
No comments:
Post a Comment