08 September, 2009

माझ्या त्या अस्थी पुनः चैतन्याने पेटून प्रदीप्त होतील !


स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदुस्थानात चौकशीसाठी पाठवण्याचे ठरले तेव्हा ते लंडनला ब्रिक्स्टनच्या बंदिशाळेत होते. हिंदुस्थानात नेल्यावर काळेपाणी अथवा मृत्यूदंड हा ठरलेला, अशा परिस्थितीत त्या देशभक्ताच्या समोर एकच विचार होता तो म्हणजे स्वातंत्र्याचा, देशसेवेचा. हिंदुस्थानात केव्हाही पाठवले जाईल अशा अवस्थेत असताना त्यानी आपल्या क्रांतिकारक मित्राना निरोप धाडला की, आपण सर्व विधात्याने नेमून दिलेली कामे करण्यासाठी दूर होत आहोत. क्षणात दिसू तर क्षणात नाहीसे होऊ. कधी शिखरावर तर कधी तळाशी. पण जेथे जाऊ तेथे सर्वोत्कृष्ट ठरू.

माझ्या दीनाच्या अस्थी कोठेही पडोत, अंदमानच्या एखाद्या उदास ओढ्यात त्या विखुरल्या जाओत अथवा श्रीगंगेच्या स्पटिकासारख्या पावन प्रवाहात. जेव्हा भारतमाता स्वतंत्र होईल तेव्हा ज्या युद्धात मी कामाला आलो ते युद्ध जिंकले म्हणून माझ्या त्या अस्थी पुनः चैतन्याने पेटून प्रदीप्त होतील. पण तो पर्यंत अगदी डोळा लागू न देता मातृभूमीच्या वैभवाकरिता एकसारखे काम करीत राहा. येतो ! जयजय !


2 comments:

  1. A minor nitpick: Savarkar was held in Brixton (not Bixton) prison in London. And he wrote 'ne majasi ne' on the beach of Brighton in the county of Sussex.

    The site www.savarkar.org says: 'Savarkar was arrested in London on 13 March 1914 and kept in Brixton prison.' I doubt the date because Savarkar's famous attempt at escape occurred off the coast of Marseilles in 1910, and I doubt whether he was ever free after that until his release from Andaman to be arrested in 1914.

    ReplyDelete
  2. अनामिका:
    ब्रिक्स्टन ऎवजी बिक्स्टन झालं होतं. चुक लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates