वेरुळची लेणी
बालपणापासून बालभारतीच्या पुस्तकतून खुणावणारी वेरूळची कैलास लेणी प्रत्यक्षात बघणार म्हणून मी जरा जस्तच उत्तेजीत झालो होतो. औरंगाबाद पासून ३१ कि.मी. वर वेरूळची लेणी आहेत. बौध, हिंदू आणि जैन या तीन धर्मांचा संगम म्हणून या लेण्यांकडे पाहता येईल. एकूण ३४ लेणी असलेल्या या परिसरात १६ क्रमांकाची मुख्य लेणी पहायला दोन तासाहून जास्त वेळ लागला. ही लेणी पाहून खरच थक्क व्हायला होतं. ‘जागतीक वारसा स्थळ ‘ म्हणून घोषित झालेली ही लेणी म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना आहेत. संपुर्ण कैलास मंदीर एका खडकाच्या डोंगरात कोरून काढलं आहे. हा समृद्ध परंपरेचा वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे हे पाहून खुप बरं वाटतं. परंतू पुरातत्व खात्याकडून म्हणावी तशी व्यवस्था इथे केलेली नाही. अंधारामुळे अनेक शिल्पकृती निट पाहता येत नाहीत. (आपल्या बरोबर विजेरी घेवून जा.) वटवाघळानी केलीली घाण आणि दुर्गंधी मुळे विरस होतो. या लेण्यां नंतर क्र. २९ मध्ये बरेच कोरीवकाम आहे. ज्याना मनापासून लेणी पाहायची आहेत त्यांनी संपुर्ण दिवस फिरून पाहण्या सारखी ही लेणी आहेत.
घृष्णेश्वर मंदीर
सोमनाथ आणि श्रीशैल नंतर बारा जोतिर्लींगा पैकी एक असणारं घृष्णेश्वर मंदीर पहायचा योग आला तो वेरुळच्या लेण्यांमुळे. औरंगाबाद पासून ३२ कि.मी. वर हे मंदीर आहे. आम्ही गेलो तो वार सोमवार असल्याने आणि सुट्टीचे दिवस असल्याने बरीच गर्दी होती, पण त्या मुळे बाहेरून जास्त वेळ मंदीर पाहता आलं. राजा कृष्णदेवरायने दहाव्या शतकात हे मंदीर बांधलं आणि त्या नंतर १९ व्या शतकात इंदोरच्या राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदीराची पुनर्बांधणी केली. (गर्दी आणि तथाकथीत धर्ममार्तंड या मुळे फोटो काढता आले नाहीत.)
MAST....SUNDAR PHOTO .AANI....UTKRUSHT PRAVAS VARNAN
ReplyDeleteTYABADDAL DHANYWAD..