चित्रकला अभिजात कलेपैकी एक. कसं असतं बघा देव वरूनच ठरवून पाठवतो, की जा तू चित्रकार. चित्रकार होता येत नाही तो असावा लागतो. म्हणजेच चित्रकार ती कला घेऊनच जन्माला येतो. असं असलं तरी ती एक साधना आहे. अंगात कला असली तरी ती दृष्य माध्यमात प्रकट करणं हा कलाकाराचा उत्तम अविष्कार आहे. एकाग्रतेने, मग्न होवून, स्वतःला विसरून कलाकार जेव्हा कला पेश करतो तेव्हा तो इश्वरी शक्ति आणि रसिक या मधलं माध्यमच असतो.
चित्रकाराने काढलेलं चित्र विकत घेता येतं पण ते कसब विकत घेता येत नाही. ते अंगी असावं लागतं. मित्रहो, असाच एक उपजत कलाकार आहे माझा मित्र शरद तावडे, प्रचंड वेगवान अशा या पैशाच्या दुनियेत कलेची उपासना करणारा आणि म्हणूनच वेगळा. शरदच्या कलेचा नेत्रसुखद अनुभव घ्यायचा आहे ना ? मग त्याच्या या प्रदर्शनाला नक्की भेट द्या.
नेहरू सेंटर, वरळी, मुंबई.
सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत
No comments:
Post a Comment