11 September, 2009

माझं घड्याळ तूझा हात, जनतेवर करू वज्राघात


माझं घड्याळ, तूझा हात
वीज झाली गायब, पेटव वात
माझं घड्याळ, तूझा हात
शेतकर्याचा कुणी रे केला घात ?

माझा हात, तूझं घड्याळ
सोन्याच्या भावाने विकीन तुरडाळ
माझा हात, तूझं घड्याळ
दुध पिऊन जगेल ना रे बाळ ?

तूझं घड्याळ माझ्या हातावर
काल पाठवलेली परत मागव साखर
तूझं घड्याळ माझ्या हातावर
म्हाडाचं खरच का मिळतं घर ?

तूझ्या हातात माझा हात
मतं मागू एकसाथ
निवडून आल्यावर पुन्हा एकदा
जनतेवर करू वज्राघात


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates