आज पोतदारांचा खुप दिवसानी फोन आला. काल दसर्याच्या शुभेच्छांचा SMS पाठवला होता. त्याचं उत्तर म्हणून त्यांनी हा फोन केला. पोतदार तसे नेहमी भेटणारे. भेटलो की छान गप्पा व्हायच्या. ते निवृत्त झाल्यापासून भेट नाही झाली. फोनवर बोलण्यासारखं काही काम नव्हतं त्या मुळे फोन केला नाही. माणसांचं हे असच असतं. एकाच वर्गात असणारे मित्र, एकाच ऑफिसात काम करणारे, एकाच वाटेने जाणारे, एकाच ट्रेनने एकाच डब्यातून जाणारे असे कितीतरी मित्र आपण रोजच्या रोज भेटत असतो, बोलत असतो, सहलीला जातो खुप छान सहवास असतो तो, तेव्हा त्याचं काही वाटत नाही, रोज भेटणार हे गृहीत धरलेलं असतं. पण शाळा कॉलेजचे दिवस संपतात तेव्हा, एखाद्याची बदली होते तेव्हा, एखादा निवृत्त होतो तेव्हा वाटा वेगळ्या होतात. मनात असुनही भेटता येत नाही, बोलता येत नाही. प्रत्येक जण आपापल्या व्यापात असतो. दिवस, महिने, वर्ष संपत जातात आणि कधीतरी असा फोन येतो तेव्हा आपण भुतकाळात रमून जातो. आठवणी काढत बसतो. पुन्हा भेटूया म्हणून ठरवतो. पण आता प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या झालेल्या असतात. भेटलो तरी मैफील जमेलच असं सांगता येत नाही. तेव्हा जवळ असताना हातचं राखलं नाही तर दूर झाल्यावरही ओढ वाटते, भेटावस वाटतं. हीच खरी कमाई असते. पोतदारानी अशी कमाई भरपूर केली आहे. बघू, त्याना लवकरच भेटेन.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
No comments:
Post a Comment