येणारा प्रत्येक क्षण नवा असतो
आशेचा एक अंकुर घेवून येतो
भुतकाळातील बेसूर स्वर
उगाच आळवत बसायचा नसतो
कालचं सुखही जुनं होतं
आणि कालचं दुःखही विसरलं जातं
जीवनाच्या या वाटेवर
पुढचं आकाश मोकळं असतं
काळाच्या उदरात काय दडलय ?
जे झालं ते घडलय की बिघडलय ?
त्याच उत्तर काळच देईल
पण खरं सांगा कुणापासून कुणाचं अडलय ?
विस्मरण हा काही शाप नसतो
दुःख विसरण्यासाठी तो वरदानच ठरतो
आठवणींचं ओझं फेकून
नवा क्षण जगायचा असतो
नरेन्द्र प्रभु
chhan kavita.
ReplyDeleteनमस्कार क्रान्ति
ReplyDeleteआपलं माझ्या ब्लॉगवर स्वागत आहे. प्रतिक्रीये बद्दल आभारी.
कविता आवडली. सर्वानी हा दृष्टीकोन ठेवला पाहिजे.
ReplyDelete