शंकराने भोळेपणाने गंगा दिली
आपण मात्र तिची गटारगंगा केली
गंगा माता, गंगा देवता मानत आलो
त्याच गंगेशी व्यभिचाराने वागत आलो
गंगा पवित्र म्हणून गंगा स्नानं केली
स्नान करतानाच पाप्यानी तिला मैली केली
गंगाजलात आहे शुद्ध रहाण्याचं चिलखत
आपण प्रदुषणाने ते आहोत भेदत
सगळ्याच गोष्टींचा झाला आहे अतिरेक
आता तरी गंगेला मोकळा श्वास घेवूदे
चला गंगेची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करूया
आपलीच माता तिला स्वच्छतेचे डोस देऊया
I find your aptly shows our attitude to Ganga and all rivers (though we call our rivers Ganga and also Mother...
ReplyDelete(Pardon me for writing this comment in English just for little convenience, though I love Marathi and also write my Marathi blog.)
I find photos are very interesting. I do some photography for documentation more than as an art form.
Please do visist my blogs.
--Remi