सांग कशी भेटू तूला
कळत नाही अजून मला ॥धृ॥
फोनवरचं बोलणं नुसतं
आपलं काहीच त्यात नसतं
तूलाही ते माहित असतं
पण पहिल्यांदा हे असचं होतं ॥१॥
बोलण्यात माझी शाळा येते
तूझ्या ऑफीसची गोष्ट निघते
हि नुसती ओढातण असते
त्यात का आपले मन रमते ? ॥२॥
फोनवर जर ही तारांबळ
मग भेटीत आणू कुठचं बळ ?
सांगून आलय आपलं स्थळ
सोस जरा अजून कळ ॥३॥
मी येणार आहे नक्की
खात्री बाळग मनात पक्की
जागा बघून ठेव परकी
आधीच भरलीय मनात धडकी ॥४॥
मोठ्ठा पाऊस आला तर ?
ओळखीचं कुणी भेटलं तर ?
मनात केलय शंकांनी घर
आता तूच मला सावर ॥५॥
No comments:
Post a Comment