लोकशाहीने दिलेल्या हक्कांपैकी मतदानाचा
हक्क हा सर्वात मोठा हक्क आहे. आपल्या मतदानाच्या या हक्कामुळे परिवर्तन होऊन
देशाचे भवितव्य ठरू शकते. त्यामुळे निराशावादी भूमिका न घेता सर्वांनी जागरुकतेने
व प्रत्येक निवडणुकीध्ये आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यामध्ये आपला
खारीचा वाटा उचललाच पाहिजे. लोकशाहीचे बळकटीकरण करायचे असेल तर जागरुक युवा
मतदारांचा एक मोठा वर्ग अस्तित्वात येणे गरजेचे आहे ज्यामुळे आपला देश
विकसनशीलतेकडून विकसित देश होण्यास निश्चितच मदत होईल. मतदानातून लोकशाही सक्षम
होत असते. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी लोकशाही मजबूत असणे आवश्यक आहे.
त्यामुळे देश घडवायचा असेल तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत. ती जबाबदारी
प्रत्येकाची आहे. त्यासाठी मतदान करणे हाच एकमेव लोकशाही मार्ग ठरतो.
मतदान न करण्याचं कोणतंही कारण असू शकत नाही. पाच वर्षांनी सर्व मतदारांना चालून आलेली ही सुसंधी असते. १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) किंवा पुलवामा सारखा हल्ला अशा प्रसंगी आपलं राष्ट्रप्रेम उफाळून वर येतं, पण त्या वेळी आपण काहीच कृती करू शकत नाही, मतदान करून मात्र आपण आपल्यासाठीच सक्षम सरकार निवडून आणू शकतो, तेव्हा मतदान कराच अशी कळकळीची विनंती आहे.